"मातृभाषा संवर्धन : काळाची गरज"
२७ तारखेला कविवर्य कुसुमाग्रजांचा
जन्मदिवस मराठी भाषा
दिन म्हणून उत्साहात
साजरा केला जातोय… एखादा दिवस
साजरा करणे खूप
सोपं होत चालंय..
पण आपण खरोखर
आपली मातृभाषा टिकावी
म्हणून काही प्रयत्न
करतोय का? किंवा
करायला हवेत तर कोणते?
हजारो वर्षापूर्वी लिहिला गेलेला
श्रवणबेळ्गोळ येथे गोमटेश्वराच्या
पुतळ्याखाली मराठी भाषेतील
पहिला शिलालेख आढळतो.
तर मराठीतील आद्यग्रंथ
म्हणून `ज्ञानेश्वरीचा' उल्लेख
करतात. मातृभाषेचे महत्त्व
ओळखून ज्ञानेश्वरांनी संस्कृत
भाषेतील भगवद्गीता
प्राकृत भाषेत अनुवादित
केली. मातृभाषेबद्दल असणारा
आदरभाव व्यक्त करताना
ज्ञानेश्वर म्हणतात,"माझा मऱ्हाटीचि
बोलु कवतुके परी
अमृतातेही पैजेसी जिंके
॥' मराठी ही
इंडो-युरोपीय भाषाकुलातील
एक भाषा आहे.
भारतातील प्रमुख २२
भाषांपैकी मराठी एक
आहे. महाराष्ट्र आणि
गोवा ह्या राज्यांची
मराठी ही अधिकृत
राजभाषा आहे. मराठी
मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी
ही जगातील पंधरावी
व भारतातील चौथी
भाषा आहे. मराठी
बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या
९,००,००,००० आहे.
मराठी भाषा ९व्या
शतकापासून प्रचलित आहे. मराठी
भाषेची निर्मिती संस्कृतमधून
निर्माण झालेल्या महाराष्ट्री
प्राकृत व अपभ्रंश
या भाषांपासून झाली
आहे. महाराष्ट्रात पंथ,
जाती, धर्म, संप्रदाय
यांची विविधता आहे,
यामुळे मराठीची प्रादेशिक
रूपे साहजिकच अनेक
आहेत. अभिजन, बहुजन,
भटके, विमुक्त, आदिवासी,
दलित अशा विविध
समाजांच्या विविध भाषिक
रूपांनी महाराष्ट्र ध्वनीत
होत असतो. मूळ
भाषिक व इतर परंपरा आणि
तिच्यात वेळोवेळी होत
असलेले बदल व त्यातून संक्रमित झालेली
आजच्या पिढीची बोली
किंवा तिची रूपे
येथे आढळतात.
`पिकते तिथे विकत
नाही' असे म्हणतात.
तसेच महाराष्ट्रात राहून
`मराठी' भाषेचे महत्त्व
तितके जाणवत नाही!
आई समोर असताना
आईचे महत्त्व जाणवते
का? आपण जेव्ह
परप्रांतात काही काळासाठी
जातो व सतत जेव्हा ती
परप्रांतीय अनोळ्कि भाषा कानावर
पडू लागते. तेव्हा
आपण आपली मातृभाषा
ऐकण्यासाठी कासावीस होतेओ. चुकून
अपली भाषा बोलणारी
, अनोळखी मंडळी दिसली
तर ती माणसे
अनोळखी असूनही खूप
आपली वाटतात! हे
भाषेचे अदृश्य धागे!
भारतात 'कॉमन मिनिमम
प्रोग्राम' अर्थात किमान
समान कार्यक्रम ही
संकल्पना सर्वपरिचित आहे. सरकार
कोणतीही योजना आखत
असते वेळी एक दिशादशर्क म्हणून या
संकल्पनेचा उपयोग होतो.
आर्थिकदृष्टय़ा मागास, शोषित-वंचित अशा
घटकांना त्यांचे हक्काचे
स्थान मिळावे अशी
या कार्यक्रमामागील भूमिका
असते. पण आपलेच
संवेदनशून्य होत जाणारे
मन सध्या विसरत
चालले आहे की, आपली भाषा-
आपली मातृभाषा ही
सुद्धा जागतिक भाषेच्या
रेटय़ासमोर- प्रसारमाध्यमांच्या प्रभावाद्वारे तिच्या हक्कांपासून
वंचित होते आहे.
आपल्याच मातृभाषेपासून आपण
दुरावत आहोत. भाषेच्या
शुद्धतेला आपण पारखे
होत आहोत. एकीकडे
इंग्रजीसारख्या भाषेचा द्वेष
तर करायचा नाहीच;
किंबहुना त्याचे ज्ञानही
मिळवायचे हे आव्हान
आहेच.. त्याचबरोबरीने आपली
भाषा समृद्ध करायची,
तिचा वापर-प्रसार
करायचा आणि तिचे
अस्तित्व अबाधित राखायचे
हे सुद्धा मोठे
आव्हान आहे. स्वत:ची मूळ
भाषा टिकवून, किंवा
वेळप्रसंगी टाकून परभाषेचा
स्वीकार करण्याची प्रवृत्ती
आज वाढत आहे.
प्रत्येक भाषेकडे असणारी लवचिकता
बोलणार्यास उपयोगी पडते.
या घटना वरकरणी
सहज घडत असल्या
तरी याचा परिणाम
म्हणून काही भाषा
क्वचितच सबल बनतात,
खरंतर बहुतांशवेळी भाषा
दुर्बल बनत जातात.
भाषेतील शब्दसंख्या कमी
होत जाते आणि
भाषेचा परिणाम क्षीण
होऊ लागतो. कालपरत्वे
अशा भाषा विस्मरणाच्या
सीमारेषेवर पोहोचतात. या सर्वेक्षणाच्या
निमित्ताने हे निरीक्षण
अधिक स्पष्ट झाले.
अनेक समाजघटकांनी घरात
बोलायची एक भाषा आणि घराबाहेर
पडल्यावर बाहेर बोलायची
भाषा, हे दोन स्वतंत्र कप्पे केले
आहेत. मुख्य प्रवाहात
येण्याची ऊर्मी, समाजातला
वावर आणि आपली
मूळ भाषा न बोलण्यामुळे फारसे न होणारे नुकसान,
यामुळे मूळ परंपरागत
भाषांकडे दुर्लक्ष होत गेले.
आपला भारत देश
इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.
तरीही इंग्रजी भाषेने
आपल्या देशात भक्कम
पाय रोवले आहेत.
आज अनेक पालक
मुलांना इंग्रजी शाळेत
घालतात. उच्च शिक्षण
मराठी भाषेतून उपलब्ध
नाही. खरं तरं,
मातृभाषा हे शिक्षणाचे
माध्यम असावे. कारण
लहानपणापासून शिकल्यामुळे आपले विचार
व्यक्त करणे सोपे
जाते. मातृभाषा ही
ज्ञानभाषा झाली तर
शिक्षण सुलभ होईल.
याचा अर्थ असा
नाही की, परकीय
भाषा शिकू नये,
परकीय भाषा जरुर
शिकाव्यात, या भाषांचा
आदर करावा, पण
आपण आपल्या भाषेच्या
समोर उभ्या ठाकलेल्या
आव्हानांना अन्य भाषांचा
जराही द्वेष मनात
येऊ न देता प्रतिआव्हाने निर्माण नाही
का करू शकणार?
आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे
युग मानले जाते.
संपर्क-क्रांतीचे युग
मानले जाते. अशा
वेळी आपण आपल्या
दैनंदिन जीवनात अशाच
छोटय़ा छोटय़ा कृतींनी
काहीच नाही का करू शकणार?
भाषेच्या जाज्वल्य नाही तरी
किमान मनस्वी अभिमानातून
आपण किमान एखादी
तरी कृती नाही
का फुलवू शकणार?
भाषेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या
सक्रिय कार्यकर्त्यांना आपल्या
परीने नाही का सहकार्य करू शकणार?
मला वाटतं की
हे फारसं अशक्य
नाही. उलट या कृतींनी आपल्यालाच 'अल्प
योगदान' दिल्याचे समाधान
लाभू शकेल. हा
'किमान भाषा वापर'
असा कार्यक्रम नसून
उलट किमान समान
कार्यक्रमाच्या धर्तीवर आधारित 'भाषा
संवर्धन आणि प्रसार
कार्यक्रम' आहे.
१) आपण आपल्या
दैनंदिन आयुष्यात रोज
किमान १० तरी 'फोन कॉल'
हाताळतोच. दहाही वेळा
आपण संभाषणाची सुरु
वात 'हॅलो..!' अशी
करतो. आपण आपल्या
मातृभाषेतून ही सुरुवात
केली तर? म्हणजेच 'नमस्कार!' या
शब्दाने आपण संवादास
सुरु वात केली
तर? त्यामुळे आपल्या
भाषेबद्दलचे प्रेमही व्यक्त होईल
शिवाय एखादी अनोळखी
व्यक्ती, जी आपल्याशी
थेट हिंदी अथवा
इंग्रजीतून संवाद साधण्यास
सुरुवात करते मात्र
तिचीही मातृभाषा मराठीच
असते अशी अधिक
जवळकीने-मोकळेपणाने आणि
मुख्य म्हणजे नेमक्या
अभिव्यक्तीद्वारे आपल्याशी संवाद साधू
शकेल.
२) आपण आपल्या
'मोबाइल'वरून किमान
१०-१५ तरी लघुसंदेश (एसएमएस) दररोज
पाठवतो. ते सगळेच
अर्थातच इंग्रजीतून असतात
किंवा इंग्रजी लिपी
आणि मराठी शब्द
अशा पद्धतीने असतात.
आपण दिवसभरात किमान
दोन लघुसंदेश मराठीतून
पाठवले तर? पुन्हा
एकदा भाषेवरील प्रेमाबरोबरच
माहिती तंत्रज्ञानात मातृभाषेचा
केला जाणारा वापर
आपल्याबरोबरच समोरच्यालाही समाधान देऊ
शकेल. शिवाय आज
कित्येकदा घरकाम करणाऱ्या
व्यक्ती इंग्रजी भाषेच्या
अज्ञानामुळे मोबाइलचा परिपूर्ण वापर
करीत नाहीत. अशांना
मराठीतील लघुसंदेश पाठविले गेल्यास
त्यांना आपण मूळ प्रवाहात आल्यासारखे वाटेल.
२) जी बाब
एसएमएसची तीच ई-मेलचीसुद्धा! आपल्याला सध्या
सर्वच संकेतस्थळांद्वारे 'फोनेटिक'
(उच्चारावरून शब्द) पद्धतीने
अनेक भाषांत ई-मेल पाठविण्याची
सुविधा आहे. ठरवून
आपण दिवसभरात किमान
एक ई-मेल मराठीतून नक्कीच करू
शकतो.
३) आज आपल्याला
सणांच्या सुट्टय़ा हव्याहव्याशा वाटतात.
पण भारतीय महिने
आणि दिनदर्शिका आपण
विसरतो. इतकी की कित्येकदा 'गुरुपौर्णिमे'च्या
तिथीऐवजी आपल्याला 'वट पौर्णिमे'ची तिथी
आठवते. पण चैत्र,
वैषाख, ज्येष्ठ.. असे
महिने आणि त्या
त्या महिन्यांत येणारे
सण आपल्याला सांगता
येतील का? नवरात्र
म्हणजे आश्विन महिना
हे किती जणांना
माहिती असते? तेव्हा
किमान ज्या सणांच्या
आपल्याला राष्ट्रीय सुट्टय़ा असतात
अशा सणांच्या तरी
भारतीय दिनदर्शिकेची आपल्याला
माहिती हवी आणि ते त्याच
तिथीनुसार बोलता यायला
हवेत.
४) आपण हल्ली
सामान्यपणे महिन्याला किमान एकतरी
चित्रपट पाहतोच.. मग
तो कितीही 'टुक्कार'
का असेना! अशा
वेळी आपण आपल्या
भाषेसाठीसुद्धा चित्रपट प्रेमातून काही
करू शकत असू तर? वर्षांतून
किमान दोन मराठी
चित्रपट आणि दोन मराठी नाटके
आपण नाही का पाहू शकणार?
किंवा अगदी मित्र-मैत्रिणींसह जाऊन आपण
नाही का मातृभाषेतील
कलाकृतींचा आस्वाद घेऊ
शकणार?
५) आपण हल्ली
सर्रास पुस्तके वाचतोच.
अशा वेळी ठरवून
वर्षांकाठी किमान दोन
मराठी पुस्तके विकत
घेऊन वाचणे ही
कृतीसुद्धा अशीच सहज
जमणारी आणि भाषेसाठी
काही केल्याचा आनंद
देणारी ठरू शकेल.
त्यापुढे जाऊन वाचकांचा
एखादा गट तयार केल्यास मराठी पुस्तक
खरेदीवर काही विशेष
सवलत मिळू शकेल
का ते पाहता
येऊ शकेल.
६) वाढदिवसाला, शुभकार्याला, अभिनंदन
करताना भेटवस्तू देण्याची
प्रथा आता चांगलीच
रुजली आहे. अशा
वेळी ही भेटवस्तू
म्हणून सर्वोत्तम मराठी
पुस्तके/ काव्यसंग्रह/ नाटय़कृती यांचा
आपण विचार करायला
हवा. एक म्हणजे
त्यासाठी आपण स्वत:
ती कलाकृती वाचलेली
असेल म्हणजे आपोआप
वाचक म्हणून आपले
भाषेसाठी योगदान होईल
आणि शिवाय इतरांना
ती वाचायला दिल्याने
भाषाप्रसारास- भाषेतील पुस्तक विक्रीस
चालना देता येईल.
७) आता मात्र
थोडी अवघड कृती
सुचवितो आहे. आपण
राष्ट्रीयकृत बँकांमध्ये हे पाहिले
असेल की तिथे दररोज एक
नवीन बँकेच्या पारिभाषिक
सूचीतील हिंदी शब्द
लिहिलेला असतो. अपेक्षा
ही असते की त्यातून प्रादेशिक शब्दांच्या
वापरास चालना मिळावी.
तद्वतच आपणही मराठीतील
दररोज किमान एक
तरी नवीन शब्द
त्याच्या सर्व छटांसहित
नव्याने समजून घेतला
पाहिजे. यामुळे कालबाह्य़
होणाऱ्या कित्येक शब्दांना (म्हणजे
प्रत्येकी किमान ३६५
प्रतिवर्षी) प्रवाहात आणता येईल.
८) आपली स्वाक्षरी
शक्य असल्यास मराठीतून
करणे. आणि सर्वात महत्वाचे
म्हणजे हा
भाषा प्रसार कार्यक्रम
प्रतिमहिना किमान ५
जणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे.
आजची आपली तरुण
पिढी, त्यांची 'सेलिब्रेट'
करण्याची वृत्ती, त्यांचे माहिती-तंत्रज्ञानावरील प्रेम, करमणूकप्रधान
समाजरचना, दिन-विशेष
असे बिंदू लक्षात
घेता हा कार्यक्रम
सहज शक्य आहे
असे मला वाटते.
त्यात जेवढी कृतिशील
भर घालता येईल
तेवढे उत्तमच !
"सर्वांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या अंतःपुर्वक शुभेच्छा…!!"
"सर्वांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या अंतःपुर्वक शुभेच्छा…!!"
नेहमी प्रमाणे आपल्या प्रतिसादाच्या
प्रतीक्षेत..!
आपला,
अभिनय महाडिक
अभिनय महाडिक
No comments:
Post a Comment