Friday, February 13, 2015

“ टायगर वापसी ”

टायगर वापसी


गेल्या महिन्यात भारत सरकारच्या वतीने केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री  प्रकाश जावडेकर यांनी देशातील वाघांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ होत २२२६ झाली असल्याचे जाहीर केले. जगभरातील वाघांपैकी ९० टक्के वाघ आपल्या देशात असून ज्या देशात वाघांची संख्या कमी आहे त्या देशात आपण वाघांची निर्यात देखील करू शकतो असेही पुढे नमूद केले गेले. मला वाटते वाघांची संख्या ३० टक्क्यांनी वाढणे नक्कीच कौतुकास्पद आहे पण हि संख्या टिकून राहणे त्यात सातत्याने वाढ होत राहण्यासाठी जाणीवपूर्वक ठोस असे पाऊले उचलण्याची गरज आहे. केवळ आताच्या आनंदात रममाण होता भविष्याच्या योजनांवर विचार हवा. भारतीय उपखंडात ज्या जंगलात वाघांची संख्या वाढली ते जंगल समृद्ध जंगल असे मानले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये वाघांची भारतीय जंगलांमध्ये वाढलेली संख्या लक्षात घेता आपण पर्यावरणाच्या बाबतीत कसे आघाडीवर आहोत हेच मंत्रीमहोदयांना सुचित करावयाचे असावे, पण मला प्रश्न पडतो कि वाघांच्या वाढणाऱ्या संख्येचे कारण आपले पर्यावरण आहे (जे आपल्याकडे आधीपासूनच आहे) कि वाघांची शिकार होणार नाही यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती संघटना यांची अविरत मेहनत आहे?

मा. मंत्रीमहोदयांना मला सांगायला आवडेल की आपल्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात प्रोजेक्ट टायगर च्या माध्यमातून व्याघ्र संरक्षण संवर्धन प्रकल्प अस्तित्वात आणले. एवढेच नाही तर १९७२ साली वन्यजीव संरक्षण कायदाही अस्तित्वात आणला पण शिकारींच्या घटना नियमितपणे वाढतच होत्या. शासकीय यंत्रणेला कित्येक वर्षे सुगावा देखील लागत नव्हता कि शिकार का होते शिकार झालेल्या वाघांचे काय करतात पण हे शोधण्याचे धाडस केले ते  बेलिंडा राईट या महिलेने.

Belinda Wright
Belinda Wright

बेलिंडा यांचा जन्म १९५३ साली कोलकाता येथे झाला. त्यांच्या आई भारत सरकारच्या वन्यजीव सल्लागार म्हणून काम पाहत होत्या. त्यामुळेच बेलिंडा यांचे वन्यजीवांशी नाते लहानपणापासूनच जुळलेले. सुरुवातीला त्यांनाही प्रश्न पडला होता कि नेमका वाघांची तस्करी का होते, शिकारीनंतर वाघांचे अवयव कुठे जातात? पण १९८९ साली त्यांना या प्रश्नांचे उत्तर मिळाले, कोलकाता पोस्ट ऑफिसमध्ये वाघांच्या कातडीचे दोन मोठे पार्सल पडलेले दिसले. (बघा आपले प्रशासन). आपल्या युरोपियन दिसण्याच्या युरोपियन वळणाच्या इंग्रजीचा फायदा घेत त्यांनी त्या पार्सलचा मग काढायला सुरुवात केली. तर त्या तिबेट मार्गे थेट चीन पर्यंत पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी - वर्षे विदेशी खरेदीदार बनून तिबेट चीनपर्यंत या तस्करीची पद्धत तस्करांची संपूर्ण माहिती गोल केली. स्वतःचा जीव धोक्यात घालून गोल केलेल्या माहितीच्या आधारे एक शास्त्रशुद्ध अहवाल भारत सरकारला सादर केला. त्यात कोणत्या जंगलांमध्ये शिकार होते, मारलेले वाघ कसे कोणत्या मार्गाने, कोठे पाठविले जातात याची सविस्तर माहिती इतर अनेक बारीक सारीक नोंदीं अहवालात नमूद केल्या. जे काम प्रशासनाने वन विभागाने १९७२ पासून १९८९ पर्यंतच्या १७ वर्षात केले नही ते बेलिंडा यांनी अवघ्या - वर्षात करून दाखविले (केवळ इच्छाशक्ति असेल तरच होयू शकते). या अहवालावरून भारत सरकार सामान्य भारतीयांना कळले कि वाघांची शिकार नागपूर, मध्यप्रदेश बिहार मध्ये होत असली तरी तिबेट चीन मध्ये वाघांच्या कातडीला अवयवांना तिथल्या धार्मिक सोहळ्यांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे तसेच ते एक श्रीमंतीचे लक्षण मानले जाते तसेच चीन मध्ये कामोत्तेजक औषधांमधील एक महत्वाचा घटक असल्याने त्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच व्याघ्र शिकारींचे प्रमाण अधिक आहे. बेलिंडा यांच्या या अहवालाला भारत सरकारने पुरावा मानून वन्यजीव कायदा अस्तित्वात आल्याच्या २१ वर्षांनंतर  २३ खटले चालविले याचे सारे श्रेय बेलिंडा यांना जाते. पुढे त्यांनी १९९४ साली  “Wild Life Protection Society of India” या संस्थेची स्थापना केली सरकारी मदतीची वाट बघता काम करण्यास सुरुवात केली. २००५ साली आठवड्यांमध्ये त्यांनी तिबेट चीन च्या मार्गावर असलेल्या ८३ वाघ  बिबट्याच्या कातड्यांची अवयवांची तस्करी पकडून दिली या धक्कादायक गोष्टीचा अहवाल चीन सरकार ला पाठवलं पण चीन सरकारने दुर्लक्ष केले, मग त्यांनी तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांना आपण गौतम बुद्धांच्या अहिंसेच्या मार्गावर चालणारे लोक वाघांची हत्या करून त्यांची कातडी पवित्र धार्मिक सोहळ्यात वापरतात हि हिंसा नव्हे का? असा थेट प्रश्न केलावर मा. दलाई लामा यांनी सहमती दाखवत सर्व तिबेट वासियांना आवाहन केले याची परिणीती म्हणून तिबेट मध्ये वाघांच्या कातडीची होळी करून त्याचा कायमस्वरूपी वापर बंद करण्यात आला.


सन १९८५ साली "Land of The Tiger" या लघुपटासाठी त्यांना Emmy Award सह १४ जागतिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पुढे त्या भारत सरकारच्या पंतप्रधानाच्या अध्यक्षेतेखालील राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या २०१० पर्यंत सदस्या होत्या. आता त्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश छत्तीसगड राज्यांच्या वन्यजीव सल्लागार म्हणून काम पाहतायेत. आत्ता पर्यंत बेलिंडा यांच्या संस्थेने २० हजार घटनांची माहिती घटनांशी संबंधित १६ हजार गुन्हेगारांची माहिती एकत्रित केली आहे. एवढे सगळे काम वाघांची संख्या वाढल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून घेणाऱ्या भारत सरकारनेही आजवर केले नाही. वाघांची संख्या वाढली याचे कारण पर्यावरण अधिवास सुरक्षित झाले एवढेच सांगितले जाते पण शिकारच होणार नाही म्हणून काम करणाऱ्या बेलिंडा राईट यांचे काय? कि, भारतातच जन्मलेली भारतालाच आपले मानून आपली हयात राष्ट्रहितासाठी घालविणाऱ्या बेलिंडा राईट युरोपियन दिसतात त्यांचे नावही विदेशी वाटते म्हणून आपण त्यांचे कामही नाकारण्याच नतद्रष्टेपणा करणार का? आता हा लेख वाचणाऱ्या आपण सर्वांनी ठरवायचे आहे कि खरे श्रेय कुणाचे?

     Indian Tiger

आपल्या प्रतिक्रियांमधून लिखाणाची एक नवीन उर्जा मिळत असते म्हणून यावेळीही आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत,

आपला,
अभिनय महाडिक.



4 comments:

  1. वाघांची शिकार होणार नाही यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संघटना यांची अविरत मेहनत आहे. हेच कारण योग्य असेल असे मला वाटते

    ReplyDelete
  2. Mast lihilay Bhaiyya...!!!

    Very Good....!!!

    ReplyDelete
  3. Very insightful article. It is indeed a relief to know the tiger population has increased and the amount of work & effort taken by the Wildlife Protection Society of India is commendable. Tigers are such majestic creatures they must be protected.

    Cheers mate!!!
    Keep up the good work Abhinay

    ReplyDelete